नको तु आमुचे संगतीं
229.
नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती ।
हे तुज सांगावे पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥
जाई तु आपुली निवडी गोधने । आम्हा न लगे तुझे येणे जाणे रे कान्होबा ॥धृ.॥
तुझी संगती ठाउकी आम्हा । त्वा मारिला आपुला मामा ।
मावशी धाडिली निजधामा । जाणो ठावा आहेसी आम्हा रे कान्होबा ॥२॥
तुझे संगती नाश बहु । पुनः जन्मा न येऊ ।
एका जनार्दनी तुज ध्याऊं । आवडीने लोणी खाऊ रे । कान्होबा ॥३॥
