वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

ज्ञानदेव म्हणे तू भक

🙏 4. संत नामदेव · ABH-081617 · अभंग क्र. ९१६

916.
ज्ञानदेव म्हणे तू भक्तशिरोमणी | जोडिले जन्मोनि केशवचरण ॥१॥
प्रेमसुख गोडी तुजची फावली | वासना मावळली सकळ तुझी ॥२॥
धन्य तुझे जन्म धन्य तुझे कुळ | धन्य तुज राऊळ जवळी असे ॥३॥
भक्तिप्रेम धन्य साधिले तुवा सार | केला पै संसार देशधडी ॥४॥
क्षणएक एकांती बैसोनी सहज | अंतरीचे गुज बोलो काही ॥५॥
जीवनमुक्त ज्ञानी जरी जाले पावन | तरि देवतीर्थभजन न संडिती ॥६॥
भक्तशिरोमणी धन्य तू संसारी | परि एक अवधारी वचन माझे ॥७॥
भूतळीची तीर्थे पहावी नयनी | असे आर्त मनी आहे मज ॥८॥
तुझिये संगतीचे नित्य सुख घ्यावे | सार्थक करावे संसाराचे ॥९॥
ऐसी उत्कंठा बहुत माझे पोटी | भाग्ये जाली भेटी तुजसी आजी ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ | करावा मुहूर्त प्रयाणासी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग