वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

प्रवृत्तिनिवृत्तीचे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088634 · अभंग क्र. १५१५

1515.
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग ।
उतरिले चांग रसायण ॥१॥
ज्ञानाग्रीहुतासी कडशिले वोजा ।
आत्मसिध्दीकाजा लागोनिया ॥२॥
ब्रम्हरस ब्रहमी सिध्द झाला पाक ।
घेतला रुचक प्रतितीमुखी ॥३॥
स्वानुभवे अंगी झाला समरस ।
साधननिजध्यास ग्रासोग्रासी ॥४॥
आरोगयता निळा पावला आष्टांगी ।
मिरवला रंगी निजात्मरंगे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग