स्थिरावल्या वृत्ती प
1514.
स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण ।
अंतरिची खूण पावोनिया ॥१॥
पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित ।
कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥
चित्त चाकाटले स्वरुपामाझारी ।
न निघे बाहेरि सुखावले ॥३॥
सुनीळ प्रकाशे उदेजला दिन ।
अमृताचे पान जीवनकळा ॥४॥
शशीसूर्या जाली जीवे ओंवाळणी ।
आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥
निळा सुखासनी प्रेमेसी डुल्लत ।
विराजला निश्चित निश्चिंतीने ॥६॥
