स्वजनीं जनार्दन विजन
1846.
स्वजनीं जनार्दन विजनी जनार्दन । जीव तो जनार्दन जीवनकळा ॥१॥
जनक जनार्दन जननी जनार्दन । जन तो जनार्दन होऊनी ठेला ॥२॥
भाव जनार्दन स्वभाव जनार्दन । देव जनार्दन जेथे तेथे ॥३॥
एका जनार्दनी आकळे जनार्दन । एका जनार्दन निश्चळ तेथे ॥४॥
