वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

विठ्ठल भीमातीरवासी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072951 · अभंग क्र. ४०६९

4069.
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी ।
विठ्ठल पुंडलिकापासी । कृपादानाविसी उदार ॥१॥
विठ्ठल स्मरणा कोवळा । विठ्ठल गौरवी आगळा ।
आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥धृपद॥
उभाचि परी न मनी सीण । नाही उद्धरिता भिन्न ।
समर्थाचे घरी एकचि अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥
रुचीचे प्रकार । आणिताती आदरे ।
कोठे ही न पडे अंतर । थोरांसी थोर धाकुटया धाकुटा ॥३॥
करिता बळ धरिता नये । झोंबता डोळे मनच होय ।
आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथे । तो नाही भरिले रिते ।
करितो सेवन आइते । तुका म्हणे चित्ते चित्त मेळवूनी ॥५॥

अर्थ :
विठ्ठल हा देव भीमातीरीच्या ठिकाणी वास करतो तो पंढरपूर निवासी आहे. तो पुंडलिकाजवळ असून भक्तांवर कृपादान करण्यासाठी अतिशय उदार आहे. विठ्ठलाचे स्मरण करण्यास अतिशय मृदू आहे, सोपे आहे, कोवळे आहे आणि सर्वांच्या दृष्टीने तो सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठल हा सर्व ब्रम्हांडाचा आधार असून भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तो लीला निग्रही म्हणजे स्वत:च्या इच्छेने रुप धारण करतो. विठ्ठल भक्तांसाठी विटेवर एकसारखा उभा आहे परंतू त्याचा शीण त्रास तो मानून घेत नाही आणि भक्त कोणत्याही प्रकारचा असला तरी त्यांचा उध्दार करण्याविषयी तो भिन्नत्व मनात आणीत नाही. समर्थ माणसाच्या घरी जर कोणी जेवणासाठी गेले तर सर्वांना सारख्या प्रमाणात सारखेच अन्न वाढण्यात येते आणि जे खरे भुकेलेले आहेत त्यांना क्षणो क्षणाला सांभाळले जाते. आवडीचे पदार्थ ते आदराने आणतात व त्यांना वाढतात त्यामध्ये त्यांच्यात कोणतेही अंतर प

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग