वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

ताप हे हरण श्रीमुख ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072910 · अभंग क्र. ४०७०

4070.
ताप हे हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसे दुःख ।
अवलोकिता उपजे सुख । उभे सन्मुख दृष्टीपुढे ॥१॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी ।
स्तविता न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥धृपद॥
रामकृष्णध्यान वामननारसिंही । उग्र आणि सौम्य काहीच नाही ।
सापडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाही याचे भातुके ॥२॥
गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण ।
व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हे ॥३॥
ठाण हे साजिरे सुंदर । अविनाश अविकार ।
अनंत आणि अपंपार । तो हा कटी कर धरिताहे ॥४॥
जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा ।
अनंता अंगी अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक ॥५॥

अर्थ :
हरीचे श्रीमुख पाहिले की त्रिविधतापाचा नाश होतो आणि भवरोगासारखे दु:ख देखील हरले जाते. हरीच्या सन्मुख उभे राहून त्याच्या दृष्टीपुढे उभे राहून त्याला पाहिले की सुख उत्पन्न होते. हरीला दृष्टीने पाहाण्याची तृप्ती पूर्ण होतच नाही हरी म्हणजे कृपेची सखोल खाणच आहे. हरी हा समचरणी असून कृपानिधी आहे त्याचे वर्णन करण्यासाठी वेदवाणी देखील पुरी पडली नाही. रामकृष्ण हे, वामन ध्यानासारखे सौम्य आणि नृसिंह ध्यानासारखे उग्र नाही. जे हरीची भक्ती करतात त्यांनाच हरीची प्राप्ती होते आणि शुध्द भक्तिभाव हाच खरा खाऊ म्हणजे भातूके हरीचे आहेत. नारायणाच्या ठिकाणी गंभीर, चातुर्य, सर्वज्ञ, शूरत्व, धैर्य आणि उदार अशा प्रकारचे अनेक गुण आहेत. नारायण हा त्रिभुवनातही व्यापक असून त्याचे लावण्य सर्वांना मोहीत करणारे आहेत. हरीच्या शरीराची ठेवण ही अतिशय साजिरी सुंदर अविनाशी अविकार आहेत. जो अनंत आहे आणि अपरंपार आहे तोच परमा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग