वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 127. जात

जात

🙏 4. संत नामदेव · ABH-083157 · अभंग क्र. २८८

288.
जात

संसार घन घनदाट | कै होईल शेवट जातीयाचा ॥१॥
जीव हेचि जाते कर्म हाचि खुंटा | वोढिती वरवंटा चौघीजणी ॥२॥
जाता वैर वैरणे जंव आहे लहाणे | जाता जाईजणे जाईल जाणा ॥३॥
एकोत्तरशे कौरव वैरिले वैरणा | पांचा पांडव जाणा तेचि जाले ॥४॥
नळनीळ मांधाता वैरियले जाता | निमिष न लागता पीठ जाले ॥५॥
संसाराचा वोढा वोढिता न वोढे | बैस पलिकडे लावी हात ॥६॥
नामा म्हणे विठोबा दीनाचे माहेर | सदा पंढरपूर गाऊ गीती ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग