वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 127. जात

जो जो जो जो रे मधुसु

🙏 4. संत नामदेव · ABH-083156 · अभंग क्र. २८७

287.
जो जो जो जो रे मधुसुदना | बाळा जगजीवना |हालवी यशोदा पाळणा | नीज बा नारायणा | जो जो जो जो रे ॥धृ.॥
प्रथम अवतारी | स्तवन करीताचि पै विधी |करुणासागर गुणनिधी | शंखासुर वधोनी ॥१॥
द्वितीये संकष्टी इंद्रासी | कूर्मरूप होसी |सिंधू मंथुनिया श्रमलासी | सौख्य समस्ता देसी ॥२॥
तृतीये वराह हिरण्याक्षी | धरुनी त्याची कुक्षी |पळता धरियेला अनुलक्षी | फोडुनि त्याची वक्षी ॥३॥
चतुर्थ नरसिंह विशाळ | अग्नीचा कल्होळ |निवडुनि असुराचे तेजाळ | काढी अंत्रमाळ ॥४॥
पंचम वामन सुंदर | क्षीराब्धीचा वर |जेणे भुलविला दिनकर | हरिला दानासुर ॥५॥
षष्टम भार्गव अभिदानी | पिता जमदग्नी |पृथ्वी नि:क्षेत्री त्रिवाणी | दिधली विप्रा दानी ॥६॥
सप्तम अयोध्यापुरवासी | राजा राम होसी |पितृवचनाचे नेमासी | राहुनिया वनवासी ॥७॥
अष्टम अवतार गोकुळी | जन्मला वनमाळी |चाणुर कंसाची मंडळी | जाळुनि केली होळी ॥८॥
नव बौध्य अवतार | पुढे येती युगांतर |दशम कलंकी येणार | नामा म्हणे संता ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग