वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विषयाचा संग नावडे जय

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076338 · अभंग क्र. ६१

61.
विषयाचा संग नावडे जयासी ।
वैराग्य मानसी संचरल्या ॥१॥
मग काय उणे सुखालागी तया ।
सर्वदा सुखिचा तोचि एक ॥२॥
नावडे ज्या संग स्त्रियापुत्रधन ।
इंद्रियाचरण नावडेची ॥३॥
नावडे पाहाणे बोलणे ऐकणे ।
नावडे मिष्टान्ने भोग भोगू ॥४॥
नावडे संपत्ति गणगोत काही ।
नावडेचि देही अहंपण ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे होईल मानस ।
प्रपंचाची आस तै तुटे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग