भ्रतारेही गावा गेलिय
62.
भ्रतारेही गावा गेलियाने सती ।
भोग ते लागती विषाऐसे ॥१॥
अनुताप तैसा संचरे शरीरी ।
आत्मा हा अंतरी वोळखता ॥२॥
अपूर्ण हा काम जालिया कामुका ।
भोग सर्व विखापरी होती ॥३॥
धनलोभियाचे धन नेता चोरी ।
क्षणही अंतरी सुख नाही ॥४॥
मीन उदकातुनी काढिलियावरी ।
विष सर्वपरी होत तया ॥५॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्मप्राप्तीविण ।
जाय एक क्षण युगाऐसा ॥६॥
