चित्तशुद्धि होय भक्त
60.
चित्तशुद्धि होय भक्तिचेनि योगे ।
होईल वाउगे दृश्यजात ॥१॥
वैराग्य संचरे मनामाजी जाण ।
जैसे हे वामन सर्व तैसे ॥२॥
विषय असत्य रोहिणीचे जळ ।
वाटते सकळ भ्रांतिरूप ॥३॥
बहेणि म्हणे जंव शुद्ध चित्त नाही ।
प्रपंच तो काही न सुटेचि ॥४॥
