वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

हरीकथेविण इच्छिती स्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080839 · अभंग क्र. ३४०३

3403.
हरीकथेविण इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथे ॥१॥
जाईल भंगोन आपुला विश्वास । अवघिया नास कारणांचा ॥धृपद॥
ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावे ॥२॥
तुका म्हणे काय झालेती जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥

अर्थ :
हरीकथेवाचूनच म्हणजे हरीकथा ऐकल्याशिवायच आपले स्वहित हाईल असे काही लोकांना वाटते परंतू हरीजन हो तुम्ही आपले चित्त हरीकथेवाचून दुसरे कोठेही घालू नका. कारण हरीकथेवाचून जर इतरत्र तुम्ही चित्त घालाल तर तुमचा हरीकथेवरील विश्वास कमी होईल आणि सर्वनाशच होईल. आपण भोजन करताना पंगतीत ज्याच्याबरोबर बसतो त्या मनुष्याने जसे भोजन खाण्यासाठी निवडले तेच भोजन आपल्याला देखील त्याच्या संगतीत बसूनच खावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, संतसंगती करणे हे केव्हाही चांगले ज्याने गीता लिहीली अशा देवापेक्षाही तुम्ही थोर आणि शहाणे झाला आहात काय ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग