(श्री ज्ञानेश्वर महा
3404.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
सेवके करावे स्वामीचे वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईल जीव का सारील परते । भंगलिया चित्ते सांदीजेना ॥धृपद॥
खद्योते दावावी रवी केवी वाट । आपुले ते नीट उसंतावे ॥२॥
तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजो भेदे ॥३॥
अर्थ :
सेवकाने स्वामीने दिलेल्या शब्दाचे पालन करावे ते करत असताना हुतूतूपणा करु नये. स्वामी आपल्याला कामावरुन दूर लोटेल किंवा आपला जीव घेईल तरी देखील आपण स्वामीने दिलेले शब्द पाळावेत कारण एकदा की आपले मन फाटले तर पुन्हा ते एकत्र येणे शक्य होत नाही. काजव्याने आपण चाललेल्या वाटेने गुपचूप चालत राहावे सूर्याला वाट दाखवण्याच्या भानगडीत त्याने पडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, श्री ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचा सागर आहेत ते आपले ह्दयस्थान भेदाच्या ओलाव्याने अव्दैताचा सुगंध भिजू देत नाहीत.
