वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तामसाची तपे पापाची स

🙏 3. संत तुकाराम · ABH-080691 · अभंग क्र. ३४०२

3402.
तामसाची तपे पापाची सिदोरी । तमोगुणे भरी घातले से ॥१॥
राज्यपदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगावा ॥धृपद॥
इंद्रिये दमिली इच्छा जिती जीवी । नागविती ठावी नाही पुढे ॥२॥
तुका म्हणे हरीभजनावाचून । करिती तो सीण पाहो नये ॥३॥

अर्थ :
तमोगुणाने युक्त असलेल्या मनुष्याने तपे जरी केले तरी त्याने पापाचा संग्रह केला आहे कारण कोणतेही कर्म तो तमोगुणाच्या प्रेरणेनेच करत असतो. सध्या जरी तो राज्यपद किंवा संपत्तीचा भोग घेत असेल तरी या सर्वांचे उल्लंघन करुन तो नरकगावाला जातो. त्याने जरी इंद्रियांचे दमन केले तरी त्याच्या जीवामधे इच्छा वासना जीवंत राहातात आणि त्याच त्याला पुढे नागवून सोडतात हे त्याला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जर एखादा मनुष्य हरीभजनावाचून इतर कोणतेही साधन करीत असेल तर तो व्यर्थ त्रासच करुन घेत आहे असे समजावे व अश्या मनुष्याला आपण कधी पाहू देखील नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग