वारंवार किती करू करक
169.
वारंवार किती करू करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावे आता हेचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारी ॥२॥
केव्हा तरी तुम्हा होईल आठवणे । हाचि एक भाव धरू आता ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करू ॥४॥