यातीहीन मज म्हणती दे
168.
यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करू तुमची सेवा ॥१॥
आम्हा नीचांचे ते काम । वाचे गावे सदा नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायणा । पदरी घेतले मज दीना ॥४॥