वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

मथनी मथन मधुरता आपण

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090151 · अभंग क्र. ११९

119.
मथनी मथन मधुरता आपण । विश्वी विश्व पूर्ण सदोदित ॥१॥
ते हे चतुर्भुज मुगुटवर्धन । सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥२॥
दुमदुम पाणि दुमिळित ध्यानी । दृढता निशाणी काष्ठी लागे ॥३॥
ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हे अचळ । शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥४॥
क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा । आपरूपे भिन्न होऊ नेदी ॥५॥
निवृत्ति कठिण गयनिप्रसाद । सर्वत्र गोविंद नंदाघरी ॥६॥

अर्थ:
मंथन करुन दह्यातुन जसे लोणी व ताक काढले जाते नवनीत शुध्द व ताक असार मानले जाते तसे ह्या परमात्म्याच्यामुळे विश्वातुन चैतन्य सार व जड असार वेगळे निघते हे पूर्णस्वरुपात ह्या विश्वात आहे. तोच परमात्मा चतुर्भुज रुप टाकुन उंच मुकुट धारण करून श्रीकृष्ण बनुन खेळत आहे. पातळ पाणी स्तब्ध होऊन मुळाला मिळाल्यावर झाडाचे लाकुड कठीण स्वरुपाला प्राप्त होते. जसे सर्व वाद्यात शिरस्थान विणेचे अढळ आहे तसेच ब्रह्माचे स्थान अढळ आहे. व तेच ब्रह्म मायाजाळाचे शोषण करुन ब्रह्मस्वरुप दाखवते. त्या ब्रह्मस्वरुपाचे दर्शन झाल्यावर पुर्वजन्मीचे दुःख क्लेष हे त्या जीवाजवळ फिरकु ही शकत नाहीत म्हंणजेच तो जीव व ते ब्रह्म यांचे एकरुपत्व होते.निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या प्रसादाने तो सर्वासाठी कठिण असलेला नंदाघरचा परमात्मा मला सोपा झाला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग