वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

निरकृत्य कृत्य विश्व

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090077 · अभंग क्र. ११८

118.
निरकृत्य कृत्य विश्वाते पोखिते । आपण उखिते सर्वाकार ॥१॥
तोचि हा सावळा डोळ डोळस सुंदर । रुक्मिणीभ्रमर कृष्ण माझा ॥२॥
निश्चळ अचळ नाही चळवळ । दीन काळ फळ हारपती ॥३॥
निवृत्ति सोपान खेचर हारपे । तदाकार लोपे इये ब्रह्मी ॥४॥

अर्थ:
निर्गुण निराकार परमात्मा विविध आकाराने नटलेल्या जगाचा निर्मिता आहे. स्वतःच अनेक आकार धारण करुन ह्या जगाचे पोषण ही करतो. श्री रुक्मिणीच्या भोवती हा राहणारा कृष्णभ्रमर जरी सावळा असला तरी सर्वांग सुंदर आहे. अकर्ता निर्गुण परमात्मा हालचाल करत नाही तरी ही त्याच्यामुळे रोज दिवसरात्र होत असतात हे आश्चर्य आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, नावाने वेगळे असणारे सोपान, खेचर जरी भिन्न वाटत असेल तरी त्यांच्यातील ब्रह्मस्वरुप एकच असल्याने त्यांच्यातील एकत्व मी पाहात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग