वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

मन निवटले ज्ञान सांड

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090093 · अभंग क्र. १२०

120.
मन निवटले ज्ञान सांडवले । ठाणदिवी केले ध्यानलागी ॥१॥
उमटल्या ध्वनी कृष्णनामठसे । सर्व ऋषिकेश भरला दिसे ॥२॥
दिशा दुम ध्यान हारपली सोय । अवघा कृष्ण होय ध्यानीमनी ॥३॥
निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु । कृष्णचि उपवडु दिसतसे ॥४॥

अर्थ:
जसा लामण दिवा लावल्यावर प्रकाश पसरतो तसा परमात्मज्ञानाचा दीप मनात लाऊन विज्ञान म्हणजे संसार ज्ञान टाकुन मनात त्या स्वरुपाचे ध्यान लावले. त्यातुन जो अनुहत ध्वनी श्रीकृष्ण नामाचा प्राप्त झाला व हे जगत त्या हृषीकेषाने विनटले आहे हे जाणवले. तो अवघा कृष्ण ध्यानीमनी असल्यामुळे मायिक विश्वातील जड व दिशा या यांचे ज्ञान हरपुन गेले.निवृत्तिनाथ म्हणतात माझे असे ध्यान लागल्यामुळे सर्व मनात तो सर्वत्र भरल्याने सर्व जागी ते कृष्णरुप मला दिसत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग