वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

भाव भजनातें निपजवी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088018 · अभंग क्र. २१४५

2145.
भाव भजनातें निपजवी । भक्त देवातें उपजवी ॥१॥
आता भजनीं देव केला । भक्त वडील देव धाकुला ॥२॥
सेवा करणे हा संकल्प । भक्त देवाचाही बाप ॥३॥
भक्ता कळवळा देवाचा । देव झाला त्या भक्तांचा ॥४॥
देव भक्तांचे पोटी । झाला म्हणोनी आवड मोठी ॥५॥
एका जनार्दनी नवलाव । कैसा भक्तचि झाला देव ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग