भावे घातली कास देव झ
2144.
भावे घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन आणिक नाही ॥२॥
भावाचेनि बळे जीवपणें वोवळें । मन हे सोंवळें ब्रह्मा साम्य ॥३॥
एका जनार्दनी भावचि कारण । सच्चिदानंदावरी खूण दाविली ते ॥४॥
