वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

एका भावे कार्यसिद्धि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087998 · अभंग क्र. २१४६

2146.
एका भावे कार्यसिद्धि । एका भावे तुटें उपाधी । एका भावे आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ॥१॥
एक भावे करी भजन । एका भावे संतसेवन । एका भावे वेदवचन । पाळीतां तुटे भवपीडा ॥२॥
एका भावे योगयाग । एका भावे तप आष्टांग । एका भावे द्वैत ते सांग । तेथे द्वैत नको बापा ॥३॥
एका भावे रिघे शरण । एका भावे एक जनार्दन । एका भावे धरी चरण । कायावाचामनेंशीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग