सांवळी प्रतिमा घेवुन
17.
सांवळी प्रतिमा घेवुनि सुकुमार । खेळत सुंदर गोकुळी रया ॥१॥
त्या रुपे वेधिले काय करू माय । अवघे निर्गुण होय पाचारिता ॥२॥
मीपणा ठाव नुरेचि पै सर्वथा । प्रपंचाची कथा ब्रह्म जाली ॥३॥
बाप निवृत्तिराजे दाविताती खुणा । नाम नारायणा पाठ किजे ॥४॥
