वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › १. मंगलाचरण

अगा ये षड्गुण भाग्यव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089716 · अभंग क्र. ७

7.
अगा ये षड्गुण भाग्यवंता।
समग्र लक्ष्मीचिया कांता।
समग्र यशाते तू धरिता।
समग्र ऐश्रवर्यता तुज अंगी ॥१॥
समग्र औदार्यलक्षणी।
समग्र वैराग्याची खाणी।
मग्र ज्ञानशिरोमणी।
समग्र षड्गुणी संपन्ना ॥२॥
यशें थोरविला मारुति।
विभीषण केला लंकापती।
औदार्य देऊनी कर्णा हाती।
कीर्ति दिगंती फाकविली ॥३॥
ज्ञाने उपदेशिला चतुरानन।
ऐश्वर्य वाढविला अर्जुन।
वैराग्यशुकार्ते बोधून।
ब्रम्ह सनातन पावविला ॥४॥
निळा म्हणे इही अगाध लक्षणी।
वंद्य सुरासुरा तू त्रिभुवनी।
माझी अलंकारुनिया वाणी।
प्रवर्तवावी स्तवनी आपुलिया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग