सीता उत्तर - अभंग ९२
929.
सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१
सावध ऐके साजणी । प्रवेशतां रामानुसंधांनीं । चित्त चित्तपणा विसरुणी । राम होउनी स्वये राहे ॥१॥
द्रष्टा परिछिन्न होय । तै दृश्य दृश्यत्वें दिसो लाहे । श्रीराम स्वये तैसा नोहे । परी ते माय सांगेन ॥२॥
श्रीराम हो उनी व्याप्य एक । असता राम होआवे व्यापक । त्रिपुटीचा आभावो देख । व्याप्य व्यापक तेथे कैचें ॥३॥
म्हणती सर्वांच्या अंतरी । राम असे चराचरी । तो रावणाचे शरीरी । एका जनार्दनी नांदत ॥४॥
