विठोबाचे पाय जन्मोनि
822.
विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे|संबंधी तोडावे कामक्रोध॥१॥
ऐक्य सुख घ्यावे एकविध भावें|प्रेम न संडावे आवडीचें॥२॥
अनंत जन्मा यावे ऐसे भाग्य व्हावें|एक वेळा जावे पंढरीसी॥३॥
वृत्तिसहित मन पायींच ठेवावें|अद्वैत भोगावे प्रेमसुख॥४॥
देही देहभाव प्रकृति दंडावें|सांडणे सांडावे ओवाळुनी॥५॥
नामा म्हणे ऐसे घेतले माझ्या जिवें|विठोबा पुरवावे आर्त माझें॥६॥
