धन्य भाग्याचे जन इहल
1408.
धन्य भाग्याचे जन इहलोकी । कीर्तने जाले सुखी कृतकृत्य ॥१॥
पातकी घातकी यासी सोपा पंथ । कीर्तन तरती कलीमाजी ॥२॥
योगयोग व्रत तप कल्पकोडी । कीर्तन श्रवण गोडी तेथे नाही ॥३॥
वेदशास्त्र पुराण श्रुतीचें आनुमोदन । करा रे कीर्तन कलीमाजी ॥४॥
एका जनार्दनी आल्हादे कीर्तन । करिता श्रोते वक्तें जाण पावन होती ॥५॥
