सोवळा तो झाला । अंगी
3240.
सोवळा तो झाला । अंगीकार देवे केला ॥१॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥धृपद॥
चुकला हा भार । तयाचीच येरझार ॥२॥
तुका म्हणे दास । झाला तया नाही नास ॥३॥
अर्थ :
प्रत्यक्ष देवाने ज्याचा अंगीकार केला तो सोवळा म्हणजे सर्वांपेक्षा वेगळा होऊन राहिला आहे. बाकीचे इतर लोक केवळ पोट भरण्याकरता सोवळे राहून इतर कलमे करतात व असे हे दुष्ट लोक भोजन करतात केवळ पोट पोसण्यासाठीच. ज्याचा अंगीकार देवाने केला त्याचा जन्ममरणाचा येरझार व इतर सर्व योगक्षेमाचा भारच चुकला. तुकाराम महाराज म्हणतात, जो भक्त देवाचा झाला आहे त्याला नाश नाही तो अमरच झालेला असतो.
