वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

उजळिता उजळे दीपकाची

🙏 3. संत तुकाराम · ABH-080486 · अभंग क्र. ३२३९

3239.
उजळिता उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगी ॥१॥
एकी महाकष्टे मेळविले धन । एकासी जतन दैवयोगे ॥धृपद॥
परिमळे केले चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥
तुका म्हणे जया अंगी नामठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥

अर्थ :
दीपकामध्ये वात पेटवली तरच ती प्रकाशीत होते परंतू हिऱ्याच्या अंगी प्रकाश हा स्वयंभू असतो. एकाने मोठे कष्ट करुन धन मिळवलेले असते आणि एकाला दैवयोगाने त्याच्या वडिलोपार्जित धनाचा लाभ होऊन जातो. चंदनाचा सुगंध येतो त्यावेळी हे चंदन आहे असे चिन्ह तो सुगंध देत असतो परंतू तरीही त्यामध्ये जो निवड करतो तो गाढवच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंगी हरीनामाचा ठसा उमटलेला आहे तो हा संसारसमुद्र सहजरित्या तरुन जातो आणि सर्वांना वंद्य होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग