आजि शिवला मांग । माझ
3241.
आजि शिवला मांग । माझे विटाळले आंग ॥१॥
यासी घेऊ प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥धृपद॥
झाली क्रोधासवे भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥
अनुतापी न्हाऊ । तुका म्हणे रवी पाहू ॥३॥
अर्थ :
मला आज मांग शिवला त्यामुळे माझे अंग विटाळले आहे. याला आता एकच प्रायश्चित्त आहे ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल असे नाम चिंतन ह्दयात घेऊ. अहो माझ्या अंगाला आज क्रोधरुपी मांग शिवला आहे अश्या मांगाची मला आज भेट झाली त्यामुळे माझ्या तोंडावाटून विचित्र शब्द बाहेर पडून तोंडवाटे जणू नरकच बाहेर वाहत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे आज पश्चात्तापरुपी पाण्यामध्ये स्नान करुन सूर्याचे दर्शन घेऊ.
