वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

तरुणी रजकी नूतन यौवन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086886 · अभंग क्र. ३३७२

3372.
तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥
धुंडुनियां माते धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥
येरी म्हणे मी तो कुळींची निर्दोष । शुध्द माझा वंश रजकाचा ॥३॥
ऎकिला संवाद दौंडीकरें त्याचा । आणि विनोदाचा समाचार ॥४॥
एका जनार्दनी धाऊनियां दूत । रायासी ती मात सांगताती ॥५॥
३३७३
पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला ॥१॥
साशंकित राजा लावी म्हणे हात । विमान क्षणांत उचलिले ॥२॥
धन्य म्हणे राजा ही माझी प्रजा । रजकाचेवे भाजा धन्य जाली ॥३॥
सांगे सकळांसी एकादशीर करा । हरिदिनीं जागरा निजू नका ॥४॥
एका जनार्दनी सांडोनी अभिमान । तेव्हांची साध्य होय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग