.
२१४९..
जो जया चित्ती भाव । तैसा तैसा होय देव । येथे संदेही धरणे न लगे ॥१॥
द्रौपदी स्मरता माधव । धांव घेतली लवलाहे । जया जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥
अशोक वनी सीता । शुद्धि जाता हनुमंता । भावेंचि तत्त्वता । कार्यसिद्धि ॥३॥
समरांगणीं तो अर्जुन । मोहिलासे गोत्र देखोन । तेथेंचि जनार्दन । भावे गीता सांगे ॥४॥
ऐसा भावाचा लंपट । सांडोनी आलासेवैकुंठ । एका जनार्दनी नीट । विटे उभा राहिला ॥५॥
