माझे कुळींची कुलस्वा
3926.
माझे कुळींची कुलस्वामींनी । विठाईजगत्रय जननी । येई वो पंढरपुर निवासिनी । ठेविलेदोनी कर जघनी । उभी सखीसजणी ॥१॥ येई । पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी रंगायेई वो ॥धृ.॥ मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधिले । ज्ञान कळसवर ठेविले । पुर्ण भरियलें । धुप दाविले । सुवासें करुनी ॥२२॥ सभा मंडप शोभला । भक्तिचांदवा दिधला । उदो उदो उदो शब्द गाजला । रंगमाजला । वेद बोलिला । मुळची ध्वनी॥३॥शुकसनकादिक गोंधळी । जीवशीवघेऊनी संबंळी । गाती हरिची नामावळी । मातले बळी । प्रेमकल्लोळीं । सुखाचे सदनी ॥४॥ ऐसा गोंधळघातिला । भला परमार्थ लुटिला । एका जर्नादनींभला । ऐक्य साधिला । पठाव आपुला । लाभत्रिभुवन ॥५॥
