वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 241. महारीण ३९०० ते ३९०९

जोहार मायबाप जोहार क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090318 · अभंग क्र. ३९०९

3909.
जोहार मायबाप जोहार करितें । सकळसभा स्तुति मायबापासीं सांगते । आपल्या घरचेंगाहाणे देतें । ऐका की जी मायबाप ॥१॥ तुम्हीम्हणाल कोण कोठील काई । मी तो आहेअनादिसिद्ध दाई । माझे नांव तो असे सकाई । हातो जांवई माझ्या बापाचा की जी मायबाप ॥२॥ हा तर फिरत फिरत आला । एकही नवरी न येयाच्या मनाला । माझे स्वरूप पाहून बोलताझाला । मम जनकासी की जी मायबाप ॥३॥ माझे स्वरूप देखिले पहा नयनी । मी तो केवळलक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी । दुसरी उपमा शूर्पणखेच्यावानी । शेखी आली लंकेहुनी । पती भक्षणार्थ कीजी मायबाप ॥४॥ माझे स्वरूप देखिले जेव्हांका । याने माझ्या बापास मोजिला पैका । एकढबु पैसा वरी एक आडका । वीस कवड्या कीजी मायबाप ॥५॥ अषाढमासी धरिले लग्न । तीर्थअमावस्या पौर्णिमा पूर्ण । भद्रा व्यतीपात जाणून । कुयोगी लग्न धरिले की जी मायबाप ॥६॥ यानेलग्नांत करणी केली मोठी । माझे बापासी काळीना जुनी लंगोटी । माझे आईस नाडीयाची आटी । मग कैंची की जी मायबाप ॥७॥ बहु रेलचेलयाच्या बोलाची । डेंगुमेंगु दक्षणा कैंची । पहागोष्टी करितो उंची । लुच्यावाची की जी । मायबाप ॥८॥ लग्न करुनी घरासी आणिले । घरपाहून बहुत संतोष झाले । चहुंकडून वारा भराभरचाले । ऐसे देखिले की० ॥९॥ याचे घरांतमनुष्यांची वस्ती भारी । पाहते तंव एकुलती एकम्हातारी । ती नित्य अन्न अन्न करी । लोकांचे घरींतुकड्यासाठीं की जी मायबाप ॥१०॥ पायलीभरधान्य आणावें जरी । तीन शेर ठेवावें याच्यापायांवरी । शेरांत दोघींनी कशा परी । गुजरानकरावी की जी मायबाप ॥११॥ हा तंव शंखाचाशंखपाळ । याच्या घरी नांदती कडकडीत तिन्हीकाळ । याच्या घरी पैशाचा दुष्काळ । मगतेलामिठाचा विचार कैसा होईल की जीमायबाप ॥१२॥ कपाळ माझे कैसे फुटलें । तक्र । पिऊन शरीर पुष्ट झाले । शिस्न पेलू सारखेंचाळलें । संततीचें मूळ खुंटले की जी मायबाप ॥१३॥ ऐसे बोलता राग आला असेल मनी । पहा कैसादिसतो सूर्यसुत दंडपाणी । पाहतो जैसा वक्रशनी । षण्मासींचा की जी मायबाप ॥१४॥ आतांअसो हा संवाद । याचा आमचा जन्मोजन्मींचासंमंद । संतसभेसी केला विनोद । सहज रीतीनेंकी जी मायबाप ॥१५॥ एका जनार्दनी जोहार । रात्र सरली सोंगे आहेत फार । संतांसी दंडवतवारंवार । मी करतें की जी मायबाप ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग