वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 268. डौर ३९६९

डौर ३९६९

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084601 · अभंग क्र. ३९६९

3969.
डौर ३९६९

ऐका गाये साधु सज्जनहो । महंतमहाजन हो । मननशीलमुनिजन हो । योगी सज्ञानहो सावध ऐका ॥१॥ वैकुंठराणे राज्यधर । चिन्मात्रैक राजकूमर । निजज्ञानी वेव्हारे थोर थोर । नित्य सादर ते आइका ॥२॥ विनवी जनार्दनाचाएका । सेवितो तुमच्या चरणपियुका । उजळल्यानिजात्मसुखा । डौर वाऊनियां देखा । डौरकार पैंजाहले ॥३॥ उठूनिया ब्रह्ममूर्ती । काय करावेनिश्चीती । ते ऐका तुम्हांप्रती । यथा निगुतीसांगेन ॥४॥ डौरनाद॥खुडमुड । कर्ममार्गीस्मृती॥श्लोक । गृहितं शिश्नश्चोत्थाय जगाम् दिशंउत्तरं । कर्ममार्गी विधिती । शिश्नधरूनी डावे हाती । दुर्वा घेऊनी उजवे हाती । उत्तर दिशेप्रती । हागोंजावे ॥५॥ ऐसे मुहूर्तीच हागोलागले । तेहागवटीसीअडकले । ब्राह्ममुहुर्ती साधु भले । काय करू लागलेते ऐका ॥६॥ ज्ञानमार्गी स्मृतीं॥श्लोक॥ब्राह्मोमुहुर्ते चोत्थाय चिंतवेदात्मनोहितं । आत्महितचिंतन । मज व्हावे धन धान्य । मज व्हावे मान्यतामान्य । भूत भविष्य वर्तमान । हे ज्ञान मजव्हावें ॥७॥ मज व्हावे वस्त्र कलत्र । मजव्हावें वंशीScan @ 12 Oct 2019 02:32 PM---------------------------------------------पुत्र । हे चिंतन निरंतर । ते नव्हे साचार । आत्महित ॥८॥ डुगडुग॥हे चिंतन करूनी काये । थितें आयुष्य व्यर्थजाये । जे चिंतवितें अदृष्टी आहे । हितचिंतन पाहे । आनचि असे ॥९॥ ते कैसे गायेडौरकारा वाईक बोला । द्रव्य द्रष्टा दर्शन । ध्येयध्याता ध्यान । ज्ञेय ज्ञाता ज्ञान । या हिंहुनी मीभिन्न । ऐसी चिंता गाये महानुभाव हो ॥१०॥ मीहातापायापरता । मी गुणत्रया वरूता । चहुंवांचाहुनीतत्त्वतां । अतीत तो सर्वथा । मीची मी स्वये ॥११॥ कर्मधर्मइंद्रिय सत्ता । माझेनी चालली तत्त्वता । परीमी सर्व कर्मधर्मपरता । करूनि अकर्ता मीची मीस्वयें॥१२॥जीव शीव ऐशी वार्ता । ते माझेचिस्वरूप वस्तुता । जीव शीव नाताळता । प्रकृतीपुरूषा परता । मीची मी स्वये ॥१३॥ देह जो कापावे मरण । त्यामाजी मी न मरे तो आपण । जेथेंनाहीं मीतूंपण । ते स्वरूप पूर्ण मीची मीस्वयें ॥१४॥ ऐसे करी जो चिंतन । त्याच्यामरणासीच ये मरण । आंगीन लगेजन्मबंधन ।एकाजनार्दन निजवाक्य ॥१५॥ डौर नाद । सुख आनंदवर्तेल ये चोहटीं । धादांत वेदांत सिद्धांत । बोलबोलोनी गेले बहुत । आतांमी आलो भोगांत । माझावचनार्थ सावध ऐका ॥१६॥ धादांत वाईकडोरकाराचें । वेदांतपाईकपंडीतांचे । सिद्धांत वाईकज्योतिषाचे । आणि भोगांत वाईक माझे । सावधऐका सज्ञान ज्ञाते हो ॥१७॥ डौरकाराचे बोल । विचारिती खोलच खोल । ते आशेने केले केवळफोल । विश्वासाची वोलगेली तेहे ऐका ॥१८॥ दानदेतो महा ग्वाड । नेदीतो महा द्वाड । हे बोलणेअतिशय वाड । परी लुलू करी चाड ते मज दानद्यावें ॥१९॥ तेलुलूने काय केले । बोलीलें तितुकेंवायां गेले । वाया जाऊनिगोविले । डोरकारा दिधलेंकाळमुखपण ॥२०॥ और नाद डुगडुग । धरूनिप्रतिष्ठेचे बंड । बोल बोलती प्रचंड । आशा वाढविती । वितंड । तेव्हांच त्यांचे काळेतोंड । ऐसे काळतोंडे । उदंड । जगी फिरताती ॥२१॥ ऐसी आम्हा । डोरकाराची मती । काळमुखें जगी भीक मागती । न त्याच्या डोराची नादस्थिती । ऐका तुम्हांप्रतीसांगेन ॥२२॥ डौरनादचुडमुख चुडमुख चुडमुख । दुकमुक दुकमुक दुकमुक । कुसकुस कुसकुसकुसकुस । तळमळ तळमळ तळमळ । खटपटखटपट खटपट । बुडबुड बुडबुड बुडबुड । खळबळ खळबळ खळबळ । फुसफुस फुसफुसफुसफुस । पटपट पटपट पटपट । भुंगभुंग भुंगभुंगभुंगभुंग । ऐशा नादाच्या कोटी । मग शंखनादें डौरउठी । हे नादाची मुळ गोष्टी । आता वेदांत परिपाठी । सादर परिसा॥२३॥झालीयां वेदान्त व्युत्पत्ती । आवश्य व्हावी ब्रह्मप्राप्ती । तेथेही गुणदोष उठती । ज्ञानगर्वे स्थिती । नागवी नाचे ॥२४॥ वाचूनियावेदांत । पुढीलांसी म्हणती धादांत । आपण स्वयेंअदत । गुणदोष पहात सर्वांचे ॥२५॥ पंडीत पंडीतदेखोनी दिठी । क्रोधे गुरगुर पोटी । करिती वरिवरिबोलती गोड गोष्टी । क्षुद्र दृष्टी ठेवुनीं ॥२६॥ वाग्वादबांधोनियां गांठी । पत्रावलंबन करिती हाटी । ज्ञानविकीती पोटासाठी । ऐशी वेदांत्याची गोष्टी । पंडीतपरिपाठी । अन्योन्मुख जाली ॥२७॥ आता सिद्धांतपरिपाठी । ज्योतिषी सांगे जे जे गोष्टी । सांच दिसेपरी ते खोटी । मिथ्या चाउटी ते ऐका ॥२८॥ रवीसोम प्रती । मासांच्या अंती । मंगळ साम्य समत्वायेती । सूर्याआड चंद्राची गती । जाण निश्चीतीदिनद्वय ॥२९॥ तेंअमावस्येचे दिवशी । जीवेंजीताचंद्रासी । नष्टत्व स्थापितीज्योतिषी । तेंया लोकांसीसत्य माने ॥३०॥ दृष्टी चंद्रासी नवाळी बह । नष्टचंद्रासी म्हणती कुहू । ऐसे मिथ्या बोलती बहू । करिता हा हा हू हू सिद्धान्त वक्तें॥३१॥अदृष्टंखावया नाही ज्यासी । ज्योतिषी सांगे ग्रहगतीत्यासी । तेंचि राशीच्या नांदत्यासी । म्हणती नवग्रहतुम्हांसी । सुप्रसन्न सदा॥३२॥ज्याची देखतीअवदशा । त्यासीम्हणती क्रूर ग्रहदशा । जेथे देखतीलक्ष्मीविलासा । तेथे जन्म ग्रहदशा उंचम्हणती॥३३॥एवं वेदान्त सिद्धांताचिया गती । मिथ्या वचन सत्य म्हणती । तेणेंचि सभेमाजीश्लाघ्यती । जीविका वृत्ती लक्षुनी॥३४॥एवंधादांत वेदांत सिद्धांत । तिहींचा दाविला मतितार्थ । आता माझं बोलणें भोगांत । ते तंव या लोकांतरूचेना॥३५॥तरी काही बोले चावटी । ते ऐकासादर गोष्टी । सभा देखोनिया मोठी । जो तो उठीबोलावया॥३६॥परी मज भोगांतांच्या वाईका । तुम्ही सादर होऊनी आइका । धरूनी आपुलालाआवांका । निजात्मसुखा लागुनी॥३७॥ये खेपेंआलें धरा गा ये राय हो । आले धराल तरी ढवळाधरा । ढवळा धराल तरी मासा धरा । मासा धरालतरी बांदी धरा । बांदी धराल तरी जाते धरा । जातेंधरायाकारणे मेंढा धरा । मेंढाधराया कारणे बेटकुळीधरा । ही अवघीधरायाकारणें । अवश्यधरावें ग्रहण । ग्रहण धराल तरी जीवेंभावें धरा । तेणेंचि ग्रहणेअर्धोदय करा । अगा सज्जन जन हो । आता आलेंम्हणजे काय । मळी यांचे आले ते आले धरावें । कीनाणे आले ते आले धरावे । की केणे आले ते आलेधरावें । कोणते आले धरावें म्हणाल तरी सावधानऐका गा ये बोधनिधि उदार चक्रवर्ती हो । मळियाचेंआले ते आले नव्हे । केणे आले ते आले नव्हे । नाणेआलेतेआले आले नव्हे । तरी मनुष्यदेही जे आयुष्यआलें ते आले । ते आले आले धरा गा ये सज्ञानज्ञाते हो । हे आले धरिता । अलभ्य लाभ ये हाता । सुरनर वंदितीमाथा । तीर्थातीर्थमागों येती॥३८॥ऐसें हे आले आलियावरी घालुनि प्रपंच शिळेवरी । विषय चिंतेची मीठमोहरी । ठेचा करीभलताची॥३९॥परी आल्याची एकी फोडी तरी । कोणी नेदी परमार्थावरी । यापरी आले घरोघरी । नरनारी नासिती॥४०॥डुगडुग । त्या आल्याच्यासात कातळी । उरल्या होत्या परिक्षीती जवळीं । त्या अप्नी परमार्थमेळीं । सुखाच्या सुखकल्लोळी । सुखरूप जाला॥४१॥आपण मीनलासुखकल्लोळीं । जग निवविलें सुखसमेळी । श्रीभागवताची पोहे घातली । हे ख्याती केलीपरिक्षीतीने॥४२॥खट्वांगे आले धरिले । देऊनीजन्म सार्थक केले । जन्ममरणाचे ठाव पुसिले । निजरूप केले निजांगे॥४३॥हे दुर्लभ आलेआलियां घरा । जेघालिती देहममतेचामातेरा । ठेचाकरिती विषय द्वारा । त्याच्या जन्ममरण वेरझारा नसरती॥४४॥म्हणाल आलेधरावें कैसे रीती । तरीवैराग्य विवेके घ्यावे हाती॥सदा भगवद्भावसर्वांभूती । एका जनार्दन धरिता चित्ती । निजनिश्चिती आले लाभे॥४५॥आलें धरिले आतांढवळा धरा गा ये सज्ञान ज्ञाते हो । ढवळा धराजवळा । धरिता मार्ग प्रांजळा । धरिता ढवळ्याच्याकळा । आम्ही कळीकाळा नागवों॥४६॥ज्याढवळ्यावरी आले चालें । ज्या ढवळ्यावरीं आलेंमोलावलें । ज्या ढवळेनि आले सरतें झाले । तोढवळा भावबळे जीवेंसी धरा॥४७॥तरी ढवळाधरूं काय कापुस । की ढवळा धरू राजहंस । कींढवळा धरू पारिजाची खोट । की ढवळा धरूंकाश्मीरीचा स्फटीकघट । की ढवळा कोण तोम्हणशील तरी । स्पष्ट सांगेन ऐका गाये सज्ञान ज्ञातेहो । तरी ढवळा नव्हेरे कापुस । ढवळा नव्हे तोराजहंस । ढवळा नव्हे पारिजाचाखोट । ढवळा नव्हेकाश्मीरीचा स्फटीक घट । तरी ढवळा जो निजधर्मचोखट । तिही लोकी । निजधर्म जो सोज्वळा । त्यासीच बोलीजे शुद्ध ढवळा । जो भागवतींवाखाणिला । स्वये रक्षिला परिक्षीतीनें॥४८॥एकढवळा धरीला खोटा । एक ढवळा धरीती उफराटा । एक ढवळा धरिती अव्हांटा । ऐशा ढवळ्याच्या चेष्टान कराव्या हो राया॥४९॥खोटा उफराटाआडवाटा । एक ढवळा धरिती पोटा । हे बोलील्याखटपटा । सांगेन स्पष्ट सावधान ऐका॥५०॥कासीचा पोहा लुटीती । सात्विका तेनागविती । तेणेंद्रव्य धर्म मिरविती । खोटा धर्म धरिती या नांवराया॥५१॥मारूनी धर्माच्या वाटा । लुटुन दिनचोहटा । वाढविती धर्माचा फांटा । तो जाण खोटाधर्मराया॥५२॥यापरीधर्मखोटा । आता ऐक धर्मउफराटा । धर्मचि लागेराया अधर्मवाटा । तेही निष्ठाअवधारी॥५३॥कन्याविक्रये द्रव्य संचिती । गोविक्रय द्रव्य अर्जिती । हयविक्रये द्रव्य जोडीतीं । तेंधन निश्चिती अधर्म॥५४॥जेणें अधर्मधरूनिताठा । मिरविती धर्माच्या खटपटा । या नांव धर्मउफराटा । तोधर्मलावी वाटा अधर्माचिया॥५५॥संन्यासी द्रव्य अर्जिती । तेणे द्रव्यधर्म करिती । देतेघेते नरका जाती । तो धर्म निश्चिती अधर्महोय॥५६॥विवाह मुंजिका यज्ञ करिती । द्विजाधाराद: ते द्रव्य संकल्पीती । ते मागतां न देती । द्विजा निर्भच्छिती धन मान दर्पे॥५७॥या परीधर्मनिष्ठा । करोनि धर्म करिती उफराटा । तो धर्मपडे अव्हांटा । त्याही चेष्टा अवधारा॥५८॥लौकीक वाढवावया महिमान । तुळा पुरूषे करितीदान । देहेविष्टा मूत्राचे परिपूर्ण । धन त्यासमानजोखिती॥५९॥यापरी धर्मरूप धनाचे जिणे । जोखुन विद्याभुत्रप्राय करणे । परी परमार्थाकारणें । कवडी देणे न संभवें॥६०॥केवळ मिरवावयाप्रतिष्ठा धर्म मिरविती अनेक चेष्टा । तो धर्म बांधेपाचेचा चोहटा यापरी आव्हांटा घालितीधर्ना६॥काम्य बळ धर्म करिती । जप करवूनिविजा मजुरी देती । तेही पुरती न देती । यापरीधर्मस्थिती । आव्हांटा सुती निजलाभे॥६२॥मातापित्यायें श्राद्धदिनीं । दक्षणा नांवे घालितीपाणी । . मग मागतां नेदिती ब्राह्मणी । ते धर्माचीनिशाणी अधर्मी लागे॥६३॥खोटा आणिउफराटा । धर्म सांगितला आव्हांटा । जेणे धर्म वेचेपोटा । तेही चेष्टा अवधारी राया॥६४॥आचारमांडुनि धर्मस्थिती । तद्वारा द्रव्य उपर्जिती । सेखीधर्मासी आंगोठा दाविती । द्रव्य वेचितीउदरार्थ॥६५॥श्रीमंत यजमान आले देखती । तेव्हा अग्निहोत्रादि धुम्र काढीती । तेच काळी अग्निलाविती । येन्हवी नांदती उंदीर तेथे॥६६॥यजमान पाठीमोराजाल्या देख । मागे अग्निहोत्राचीहोय राख । यापरी सज्ञान लोक । उदरार्थ देखदाविती धर्म॥६७॥काशीयात्रेलागी सबळ । नानापरी द्रव्य मेळविती पुष्कळ । तीर्थी लक्ष होयरूद्रांचे फळ । घेऊनियां फळ अर्जितीधन॥६८॥एवं उभय दोषी धन अजिती । तेही यजमानादेशवृद्धी देती । ऐसापोटालागीं धर्मधरिती । जाणगा निश्चिती सज्ञान हो॥६९॥ऐसी ऐसीधर्मचेष्टा । तो धर्म भरला सन्निपात फांटा । शुद्ध धर्माची जेनिष्ठा । ते कदा निष्ठा उपजो नेदी॥७०॥शुद्ध धर्मजो सोज्वळ । त्याते श्री भागवत म्हणे ढवळ । तोचतुष्पाद धरावा सकळ । या नांव प्रांजळपरमधर्म॥७१॥यांसीप्रथम पादतेंधन । द्वितीयपाद ते वचन । तृतीय पाद ते काईक जाण । मानसिक संपूर्ण तो चतुष्पाद॥७२॥मानसिकधर्मापुढे । धन वचन काय बापुडे । मानसिक धर्माचेंबळ गाटें । तोडीरोकडे भवबंधा॥७३॥मानसिकधर्मस्थिती । होय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती । चारही मुक्तिपायां लागती । ऐसी धर्मस्थिती अगाध॥७४॥मानसिक धर्माची कोण स्थिती । जे भगवद्भावसर्वांभूती । याहीवरूनी धर्माची गती । जाणनिश्चिती असेना॥७५॥एका जनार्दनी म्हणे । जनी जनार्दन मनींपाहणे हेचि सकळ धर्माचे निजजिणें । संसाराचे धरणे समुळ उठी॥७६॥आलेधरिलें । ढवळा धरिला । आता मासा धरा गा । येमज्ञान ज्ञाते हो । तरी मासा कोणताधरावा । कायजळीचा मासा तो मासाधरावा । की सोन्याचामासानोमासाधरावाकीरुप्याचामासातोमासाधरावा । की दिवसाचामासातोमासाघरावा । कोणतामासाधरावाम्हणाल तरी सावधान ऐका । जळींचामासातो मासा नव्हे । सोन्याचा मासा तो मासा नव्हे । रुप्याचामासातोमासा नव्हे । दिवसाचा मासा तोमासा नव्हे । जो अतिशय चळवळ । अत्यंत जोचपळ । धरितांनधरवेनिश्चळ । तोमनोमासा केवळधरूनि राखा॥७७॥चतुर्भुजाच्या गळी । कांहरिभक्तीच्या जळी । भगवद्भाव करतळी । विवेकमहाबळी । मनोमासा धरिती॥७८॥हा मनोमासाधरिल्या पाठी । धरा वैकुंठ स्वये ये भेटी । अर्धोदयेंकपिलाषष्ठी । चरणांगुष्टी पावन॥७९॥मनोमासालागल्या हाती । जीवाशी वरी ब्रह्मप्राप्ती । एकाजनार्दन धरिता चित्ती । चारी मुक्तिवोळंगण्या॥८०॥आलें धरिले । ढवळा धरिला । मासा धरिला । आता बांदी घरा गाये सज्ञान ज्ञातेहो । तरी बांदी कोणतीधरावी म्हणालातरी सावधऐका । काय तुरकाची बांदी धरावी । की रेशमाचीबांदीधरावी । कींपेवाची बांदीधरावी । कीकडब्याचीबांदी धरावी । कोणते बांदी धरावी म्हणाल तरीसावध ऐका । तरी तुरकाची बांदी ते बांदी नव्हे । रेशमाची बांदी ते बांदीनव्हें । पेंवा ची बांदी ते बांदीनव्हे । कडव्याची बांदी ते बांदी नव्हे । जे ज्यासीत्यास हात नेदी । तेधराइच्छाबांदी । कामक्रोधलोभसंधी । तिघे त्रिशुद्धी लागले धगड॥८१॥घरीक्षणभरी न राहे । मना आले त्या सवेंचि जायें । नखायेते हाटीचीखाये । नरिधावें तेथे राहे । बळेंचिरिघोनी॥४२॥तरी इसी नैराश्येची घाली बेडी । आणि बोधाचे चाबुक वरी झोडी । निरपेक्षेनें दांतपाडी । तैंच पहिली खोडी सांडील॥८३॥मग तेइच्छा नैराश्य उठी । परमानंदी पाडी मिठी । एकाजनार्दनाचे भेटी । ब्रह्मानंद सृष्टी हेलावे॥८४॥आलें धरिले । ढवळाधरिला मासा धरिला । बांदीधरिली । आतांजातेधरांगा सज्ञान ज्ञाते हो । जातेंधरावें ते कोण । काय दळितें जाते ते जाते धरावे । की दिनमानजातेंतेजातेंधरावे । कीआभाळ जातेंतें जाते धरावें । जाते धरावें ते कोण म्हणाल तरीऐका गा राये हो । तरी दळितें जाते ते जाते नोहे । दिनमानजाते ते जातेंनाहे । आभाळ जाते तेजातेंनोहे । तरी मनुष्यदेह आयुष्य जाते । ते जाते धरागा सज्ञान ज्ञाते हो । या मनुष्यदेहाची एक घडी । नमिळे वेंचिता लक्ष कोडी । तेनासिती प्रपंचाचियेवोढी । ते जोडीली जोडी महामूर्खत्वें॥८५॥मनुष्यदेहे राखावा कैशारीती । तरी सदा भगवद्भावसर्वांभूती । तेणे तात्काळ ब्रह्मप्राप्ती । नाशे कल्पांतीदिसेना॥८६॥एका जनार्दन म्हणे । मनुष्यदेहाचेनि अनुसंधानें । ब्रह्म परिपूर्ण स्वये होणे । जीणे मरणे त्यानाहीं॥८७॥आलें धरिले । ढवळाधरिला । मासा धरिला । बांदीधरिली जातेंधरिलें । आता मेढांधरा गाये सज्ञान ज्ञाते हो । मेंढा धरावातो काय । शेळीचा मेंढा धरावा । की मेंढीचा मेंढाधरावा । की पाळिता मेंढा धरावा । कोणता मेंढाधरावा म्हणाल तरी सावधान ऐका । तरी शेळीचामेंढा तो मेंढा नव्हे । मेंढीचा तो मेंढा नव्हे । पाळितामेंढा तो मेंढा नव्हे । तरी वोटीचा मेंढा तो मेंढा धरागा सज्ञान ज्ञाते हो । जो काळ रात्रीचा एडखा । शिंगेवीण बोडका । आंधारी हाणेथडका । तो एडकादृढधरा॥८८॥धराल तरी मुंडी मुरगळुन धरा । अहर्निशी जतन करा । तेणे वैकुंठीचे राज्य येईलघरा । एका जनार्दनी निर्धारा । सुरनरी वंद्य तोहोय॥८९॥आलें धरलें । ढवळा धरिला । मासाधरिला बांधी धरिली । जाते धरिले । मेंढा धरिला । आतांबेटकुळी धरा गा सज्ञान ज्ञाते हों । बेटकुळीधरायी ते कोण । काय नदीची बेटकुळी धरावी । की तळ्यांची बेटकुळी धरावी । की आडाची बेटकुळीधरावी । कोणती बेटकुळी धरावी । म्हणाल तरीसावधान ऐका । तरी नदीची बेटकुळी ती बेटकुळीनव्हे । तळ्याची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । आडाची बेटकुळी ती बेटकुळी नव्हे । तरी सेजेचीबेटकुळी धरा । धराल तरी वेगळीच धरा तिच्यापुटपुटेच्या झणत्कारा । भाळाल झणी॥९०॥तेंबेटकुळी वेगळी धरिता । चारी मुक्ति येता हाता । एका जनार्दन धरिता । ब्रह्म सायुज्यता घररिघे॥९१ । आले धरिले । ढवळा धरिला । मासाधरिला । बांदी धरिली । जाते धरिले । मेंढा धरिला । बेटकुळी धरिली । आता ग्रहण धरा गा ये अज्ञानज्ञाते हो । तरी ग्रहण धरावें कोण । रवीग्रहण कीचंद्रग्रहण । अथवा धरावे ग्रहणीं ग्रहण । ग्रहण लक्षणतें कैसे । या तीही ग्रहणाहुनीं भिन्न । घरी ते ग्रहणआहे आन । ग्रहणीं ग्रहण तेनिंद्य पूर्ण । रवी चंद्रग्रहणतें मिथ्या॥९२॥साठी सहस्त्र राहुची सीमा । लक्षभानु दोनी लक्षचंद्रमा । तेमंडळ साम्य येती समा । ते राहु रवि सोमा स्पर्श नाही॥९३॥ज्योतिषीसांगें ग्रहण गोष्टी । ते गोष्टी समुळ खोटी । पर्व ग्रासदेखिजे दृष्टी । ते चाली उफराटी लक्षवेना॥९४॥रवी राहुसीं नाही भेटी । त्याच्या सर्व ग्रासाच्याशेवटीं । ज्योतिष्य सांगे मुखसपाटीं । तेणेंचि बोंबउठी जगामाजी॥९५॥राहुची शाम प्रतीमा । तेकदा नदिसेकोमा । त्यासी प्रकाशी रवि चंद्रमा । विपरीत प्रेमा लेणे केला॥९६॥राहू गिळीता –सूर्यासी । ते सूर्य जाळीतां त्याच्या मुखासी । सूर्येप्रशिले राहुसी । म्हणोनी जगासीं तो दिसे॥९७॥रवी चंद्र प्रकाशिती राहुसी । तेणे गिळीलेम्हणती त्याली । विपरीत सांगे ज्योतिष्या । ते यालोकांसी सत्यमाने॥९८॥यापरी गारविचंद्रगहणविपरीतार्थे मिथ्या पूर्ण । तैसे चि गांग्रहणी ग्रहण । त्याज्य जाण निंद्यस्वें॥९९॥आस्थी भांसAKALLUMAMAMANARASIMHARAरूधीर चर्म । विष्ठा मुत्र पूर्ण काम । स्त्री पाहतांनिंद्यधर्म । परम अधर्मग्रहणीं ग्रहण॥१०० । रवीचंद्र ग्रहणी मुक्त स्नान । करिता देख सकळ ज़न । ग्रहणीं ग्रहणे मुक्त स्नान । सहसा सज्ञान । न शकलीकरूं ॥१॥ ग्रहणी ग्रहणापासूनि सुटला । ऐसा नदेखे दादुला । जो तो सर्वग्रासे गिळीला । जननागवला ग्रहणीं ग्रहणे ॥२॥ एवं ग्रहण लक्षण । तुज म्या सांगितले संपूर्ण । गुरू आज्ञा ते मुख्यग्रहण । सर्वी जाण धरावे ॥३॥ एका ग्रहण स्पर्शहोय।एकाचे ते आंगोळ द्वय । एकांचें ते अंगुळचतुष्ट्य । एकाचे पाहे पादमात्र ॥४॥ एकाचे तेंअर्थ ग्रहण । एकाचे ते केवळ त्रिकोण । एकांचें तेंबिंब पूर्ण । एकाचे जाण खग्रास ॥५॥ बिंब ग्रासुनीखग्रास केला । तोचि कर्माकर्मापासुनी सुटला । त्याचा भवपाश तुटला । पूर्ण विनटला गुरूग्रहणीं ॥६॥ गुरूग्रहणीं जो पूर्ण विनटला । तोचि ग्रहणींग्रहणापासून सुटला । तोचि काळाचे हातींहूनिनिष्टला । तेणेंचि ग्रासिला कळीकाळ ॥७॥ गुरूग्रहणीं ज्याचा खग्रास झाला । तोचि ज्ञेय ज्ञातावांचुनि विनटला । अहमात्मा गिळुनी ठेला । आंगेंजाहलापरब्रह्म ॥८॥ एका जनार्दन म्हणे । यापरीगा गुरूग्रहणे स्वये आंगेपरब्रह्म होणे । खत फाडणेविषयाचे ॥९॥ यापरी गुरूग्रहणीं जो खरा । तेणेंअकार उकार मकारा । निरसुनी प्रणवाच्या विकाराअर्धमात्रा धरावी ॥१०॥ अर्धमात्रा अर्धोदयो । तेथे नाही उत्पत्ती स्थितीचा प्रलयो । ब्रह्मीब्रह्मत्वाचालयो । पूर्णअन्वयोअर्धोदयाचा ॥११॥ आइका अर्धोदयाची कथा । प्रपंच एक जाहलाहोता । हे समुळ मिथ्यावार्ता । पुढे होईल मागुता । हे कदा कल्पांती घडेना॥१२॥अर्धोदयो अर्धमात्रा । पुण्यकाळ परम पवित्रा । एका जनार्दनीपूर्ण यात्रा । चिदचिन्मात्रा प्रबोध॥१३ । डेरापाहीला गायेराय हो । अंबेचे रंगणी डेरा पाहीला । तरी त्या डेरियाची कथा । सावध ऐका आता । जेपाहणे पाहते पाहता । या तिही ते तत्वता पाहोंजाणे ॥१४॥ जे अनादि निजशक्ती मोहीनी । महामाया मायराणी । डेरा मांडिला तिचे रंगणी । अती विचक्षणीं ममाभिमानी॥१५॥कर्णकुमारीच्या हाती । डेरिया आणिली औटवोलीमाती । संकल्प कुल्लाळाचे हाती । डेरा अती निगुती । गुणाचा केला ॥१६॥ कुंडीघातला वैश्वदेवो । बुडीकर्म काटें लाविती पाहावो । बुध्दीसी ठेउनींब्रह्मदेवो । डेरा निर्वाहो मांडीला ॥१७॥ संकल्प विकल्पीघातला चंद्र ग्रहणी घातलासी इंद्र । पळसासवेंलाविला उपेंद्र । सर्वाभिमानी बैसदिला ॥१८॥ वरूण ठेविलारस उत्पत्ती । प्रजा उत्पत्ती प्रजाप्रती । यम ठेविला अधोगती । नरकोत्पत्ती गुदद्वारी ॥१९॥ आश्वीनीदेवें सोडीली घानी । ते येऊनीबैसलें वाणी । डेरिया स्पर्शाचा स्पर्श मनी । तेंकाया वारेनी धरिलीसे ॥२०॥ अन्नपानाचा पचनीजठरी ठेविला जठराग्नी । प्राणापानभाते दोन्ही । फुकिती अनुदिनी अहोरात्र ॥२१॥ पंचभूतांचेचोहटा । चारी भूतग्रामयेती हाटा । जन्ममरणाचियापेठा । वसती उद्भटा कर्माकर्मे ॥२२॥ रोमसुमनांचिया माळा । शोभती डेरियाच्या गळा । तिहीअवस्था सोहळा । वेळोवेळां भोगिती॥२३॥चंहुपुरूषार्थाचे शेले । चंह मुक्तीचे ध्वज उफारिले । हरिभक्तीचे फरशबांधिले । डेरा तारू लागलेरामनामाचे ॥२४॥ अनुहात डौराचा नाद । तेथे वेदांचेवेदानुवाद । सिध्दांत बोध त्याचे शब्द । डेराप्रसिध्द अवतरला ॥२५॥ या डेरिया बाहेर जोनिघाला । तोचि दादुल्याचा दादुला । डेरिया आतजो अडकला । तो तो गेला अध:पाता ॥२६॥ जोरामनामाचें तारूंधरी । तो रिघे डेरिया बाहेरी । जोपडे निंदेच्या घरामाझारी । तो आघोरी पाविजेत॥२७॥एका जनार्दन म्हणे । ऐसी डेरियाची लक्षणे । डौरकार जालो या कारणे । डौर वाहूनी सांगणे निजहितार्थ॥1२८॥त 170 एका जनार्दन म्हणे । ऐसी

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग