महाराज ऐका माझी मुखज
3908.
महाराज ऐका माझी मुखजबानी । तुम्ही काट्यांत पडला येउनी । बरें होता तयेवनीं । हिशेब देणे लागेल की जी माय सखया ॥१॥ जिवाजी शेट्याचा पळपळाट । बुधाजी कारकूनमोठा भाट । शरीरा बाजीचा आटाआट । ऐसाआहे की जी मायसखया ॥२॥ तरी कायापुरअंकितात । परगणे मजकुरास आडवितात । हिशेबदेणे लागेल की जी मायसखया ॥३॥ तुम्हीम्हणाल ही महारीण । या प्रसंगी कुळ अगत्यारीण । जिवाजी पाटलाची प्राणमैत्रीण । लोभ मजवरफार आहे की जी मायसखया ॥४॥ आता मीसांगतें ते करा । केली कमाई नेऊ नका घरा । एकांती नेऊन पाय धरा । विठुरायाचे की जीमायसखया ॥५॥ विठुरायाचा दूत । त्याचे फारअंकितात । आहे की जी मायसखया ॥६॥ तरीआतां व्हावे सावधान । विठ्ठलासी जावे शरण । गुरुकृपेचे ध्यान धरून । जिवलग पाहेन की जीमायसखया ॥७॥ राघवासी शरण जाता । यमाजीपंताचे न चले तत्त्वता । एकाजनार्दनींविनविता । मुख जबानी की जी मायसखया ॥८॥
