॥ अभंग ९ ॥
9.
॥ अभंग ९ ॥
मुकिया साखर चाखाया दिधली ।
बोलत हे बोली बोलवेना ॥ १ ॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद ।
आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥
आनंदी आनंद गिळूनि राहणे ।
अखंडित होणें न होतिया ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें ।
जग हे करणे शहाणें बापा ॥ ४ ॥
