पुण्यवंत पाताळ लोकी
337.
पुण्यवंत पाताळ लोकी नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥1॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ0॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी ॥2॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली ॥3॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचे मारियेले बाळ ।
सखा म्हणविसी त्याचे नासी बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ॥4॥
