प्रात:काळी प्रहरा रा
119.
प्रात:काळी प्रहरा रात्री उठिल्या गौळणी बाळा । घुसळण मांडियेले घरोघरी सकळा ।
नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥
घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदे छंदे डोलती ॥धृ॥
एक म्हणती साजणी तुम्ही लपवा गे लोणी । नकळे नकळे वो बाई कृष्णाची करणी ।
कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्ही आता लपवा दुधाणी ॥२॥
बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला । कवणेंही नाही देव दृष्टि देखिला ।
सूक्ष्म रूप धरूनि डेर्यामध्ये प्रवेशला । वरच्यावरी देव लोणी खाऊनिया गेला ॥३॥
उन्हवणी शिळवणी घालिती परते लोणी येईना । काय झाले टोणे सासूबाई कळेना ॥४॥
हा हा गे बायांनो तुमचे जाणते चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसा गोळे ।
उगेंचि मग पाहता आता फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥
डेर्यामधुनी मार माझा जगज्जीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काये ॥६॥
