वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

गड्यांनो राजा की रे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073231 · अभंग क्र. १२०

120.
गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला ॥धृ॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्ही खेळू यमुने थडी ।
नाचा पाऊला देहुडी । कृष्ण आमुचा की रे गडी ॥२॥
खेळू हुतुतू हुंबरी । थडक हाणो टिरीवरी ।
आता चालिला दळभारी । आमुचा यशोदेचा हरी ॥३॥
कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकाशी ।
कडे घेऊ सावकाशी । आता बहु भितो यासी ॥४॥
आम्ही तुम्ही सवे जाऊ । गाई वळावया जाऊ ।
त्याचे मानेत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ॥५॥
नामा म्हणे चला जाऊ । हात जोडूनी उभे राहू ।
पाया पडून मागून घेऊ । जनी वनी तोचि कृष्णची ध्याऊ ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग