वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

बाळ सगुण गुणाचे तान्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073230 · अभंग क्र. ११८

118.
बाळ सगुण गुणाचे तान्हे गे । बाळ दिसते गोजिरवाणे गे ।
काय सांगता गार्‍हाणे गे । गोकुळींच्या नारी ॥१॥
श्रीरंग माझा वेडा गे । याला नाही दुसरा जोडा गे ।
तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ॥२॥
पांच वर्षांचे माझे बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे ।
का लटकाच घेता आळ गे । गोकुळीच्या नारी ॥३॥
सांवळा गे चिमणा माझा गे । गवळणींत खेळे राजा गे ।
तुम्ही मोठ्या ढालगजा गे । गोकुळींच्या नारी ॥४॥
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेता या गोपाळा गे ।
तुम्ही ठाईंच्या वोढाळा गे । गोकुळींच्या नारी ॥५॥
तुम्ही लपवुनी याची गोटी गे । लागता गे याचे पाठी गे ।
ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळींच्या नारी ॥६॥
तुम्ही लपवूनि याचा भवरा गे । धरू पाहता शारंगधरा ।
तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळींच्या नारी ॥७॥
हा ब्रह्मविधीचा जनीता गे । तुम्ही याला धरू पाहता गे ।
हा कैसा येईल हाता गे । गोकुळींच्या नारी ॥८॥
नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा हृषिकेशी गे ।
किती छळितो आम्हांसी गे । गोकुळींच्या नारी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग