दिसे सगुण हा स्वरुपस
171.
दिसे सगुण हा स्वरुपसुंदर ।
परि व्यापूनिया ठेला चराचर ।
देवादानचादि मानव असुर ।
याविण उरला ऐसा नाही तृणांकुर वो ॥१॥
ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ।
ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती ।
रजनी दिवो जया याचीचि संगती ।
त्या त्या स्वानुभवे आपुल्या बोलती वो ॥२॥
महि अंबु तेज मारुत गगन ।
जगा बीजरुप हाचि वो लपोन ।
महदमायेचे हा अनादि कारण ।
देवत्रयासी हा मूळ अधिष्ठान हो ॥३॥
आपुल्याचि गुणी ।
उरला भरोनिया चाही वाणी खाणी ।
ज्या परि हा तैसाचि साजणी ।
रुपे गुणे क्रिया मंडित भूषणी वो ॥४॥
भुवने चतुर्दश तीहि याच्या पोटी ।
स्वर्गी एकविसाहि आदि हा शेवटी ।
होण्या न होण्याच्या नेणोनिया गोठी ।
आपी आपणचि एकट एकटी ॥५॥
निळा म्हणे आम्ही नेणोनिया अबळा ।
हासो रुसो यासी करु गदारोळा ।
खेळता खेळ यासी भांडो वेळोवेळा ।
केले अपराध ते मागो या गोपाळा वो ॥६॥
