वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

नव्हते एक ना दुसरे क

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089810 · अभंग क्र. १७२

172.
नव्हते एक ना दुसरे काही यासी ।
होता लपोनिया आपुलीये कुसी ।
कांहिंचि नाळखुनि आपआपणासि ।
तोचि येउनि येथे जाला अविनशी वो ॥१॥
रुप धरिले सगुण चांगले ।
ठाणमाण माण जेथील तेथेचि रेखीले ।
चतुर्भुज शंखचक्राते मिरवले ।
मुगुट माळा श्रवणी सुतेज कुंडले वो ॥२॥
नव्हता गावसीव पहिला यासि काही ।
नामरुपासि तो आधीची ठाव नाही ।
म्हणती वैकुंठ ते कालिची जाले बाई ।
क्षीरसागर ना कैंचि शेषशाई वो ॥३॥
नव्हता काळागोरा खुजा ना ठेंगणा ।
स्‍वरुपसुंदर ना आंधळा देखणा ।
कैंचि जीवशिव तयासी भावना ।
पंचभौतिक ना नेणे पंचप्राणा वो ॥४॥
नव्हता मन बुध्दि इंद्रियांचा मेळा ।
कार्यकर्तृत्व हा कारण वेगळा ।
येणे जाणे यासी नव्हते कवण्या काळा ।
तोचि आला या नंदाच्या राउळा वो ॥५॥
यासी जीवेभावे धरा घाला मिठया ।
ऐशा बोलती गौळणी गोरटया ।
निळा म्हणे अवघ्या मिळोनि लहानामोठया ।
यासि चुकती त्या अभाग्या करंटया वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग