वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

काहीच नहोनिया काही ए

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089811 · अभंग क्र. १७०

170.
काहीच नहोनिया काही एक होता ।
नामारुपातीत आपण नेणता ।
होण्यानहोण्याच्या नेणोनिया वार्ता ।
त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥
ऐशा परि हा मूर्तिमंत झाला ।
विश्वी विश्वकार होऊनिया ठेला ।
भाग्ये आमुचिया मूर्ती मुसावला ।
गाऊ वानू ऐसा आम्हासी फावला वो ॥२॥
नव्हे ते पुरुष ना नारीपण जेथे ।
शुन्या निरशून्याहि पैलाडी परते ।
नाकळे नाद बिंदू कळा ना ज्योतिते ।
परा पश्यंतीचा प्रवेश नाही जेथे वो ॥३॥
गुणलावण्याची उघडली खाणी ।
मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी ।
मुख मनोहर कुंडले श्रवणी ।
श्रीवत्सलांछन ह्रदयी साजणी वो ॥४॥
घ्या गे उचलूनि जाऊ निजघरा ।
आजि फावला तो पाहो यदुवीरा ।
खेळो आदरे या खेळवू सुंदरा ।
याच्यासंगे नाही सुखा पारावरा वो ॥५॥
निळा म्हणे ऐशा संवादे सुंदरी ।
करिती क्रिडा सवे घेऊनि मुरारी ।
सुखी सुखरुप झाल्या कल्पवरी ।
पुन्हा न येती त्या फिरोनि संसारी वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग