वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

ज्ञानदेव म्हणे भला भ

🙏 4. संत नामदेव · ABH-081616 · अभंग क्र. ९१८

918.
ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज | कळले गौप्यगुज सर्व तुझे ॥१॥
धीर आणि चतुर सर्वस्वे उदार | साजे तुज अधिकार प्रेमभक्ति ॥२॥
धन्य तू संसारी भक्तभावशीळ | साधिले तुवा केवळ प्रेमसुख ॥३॥
देउनी आलिंगन नामा धरियेला करी | वंदियेले शिरी चरणरज ॥४॥
राऊळा भीतरी चला जाऊ वेगे | आज्ञा मागो दोघे तीर्थयात्रे ॥५॥
सत्वर उठोनी आले स्वामी जवळी | मस्तके ठेवियेली चरणावरी ॥६॥
जीवीचा निजभावो सांगे ज्ञानदेवो | ऐकोनी पंढरीरावो हासिन्नले ॥७॥
म्हणे तू ज्ञानशीळ चिद्रूप केवळ| सबाह्यनिर्मळ स्फटिक जैसा ॥८॥
सहज तीर्थरूप तूंचि निरंतर | असता हा विचार काय करिसी ॥९॥
येरू म्हणे स्वामी बोलीलेती बरवे | परि सार्थक करावे देहाचे या ॥१०॥
प्रसंगी नामयाचे संगति सुख घ्यावे | म्हणोनी ज्ञानदेवे धरिले चरण ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग