वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

हासोनी पंढरिनाथ पाहे

🙏 4. संत नामदेव · ABH-081594 · अभंग क्र. ९१९

919.
हासोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे | म्हणे नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर | करीतसे आदर संगतीचा ॥२॥
ऐसे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे | तरीच जन्मा यावे विष्णुदासा ॥३॥
जावे स्वस्ति क्षेम यावे शीघ्रवत | करावे स्वहित कळेल तैसे ॥४॥
सर्वभावे आमचा विसरू न पडावा | लोभ असो द्यावा मजवरी ॥५॥
परियेसी ज्ञानराजा बोले जगजीवनु | तू तंव सर्व सुखमूर्ति ॥६॥
परि एक मागणे आहे तुजप्रती| आठवण चित्ती असो द्यावी ॥७॥
हे कृपेचे पोसणे माझे आवडते | क्षण जीवापरते न करी कदा ॥८॥
परी तुवा सांकडे घातले सर्वथा | दाटले अवस्था हृदय माझे ॥९॥
आरुष साबडे नामे माझे वेडे | मार्गी मागे पुढे सांभाळावे ॥१०॥
ताहान भूक तुवा जाणावी जीवीची | मज चिंता याची थोर वाटे ॥११॥
मग नामयाचा हातु धरोनी श्रीपती | देतु असे हाती ज्ञानदेवा ॥१२॥
रानी वनी जनी विसंबसी झणी | धाडितो देखोनी आर्त तुझे ॥१३॥
चरणी ठेवुनी माथा निघते जाले दोघे | आले चंद्रभागे केली स्नाने ॥१४॥
पुंडलिकाचे चरण वंदूनिया माथा | उतरले भीमा पैल तीरी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग