देहयंत्र वाहे हरी ।
387.
देहयंत्र वाहे हरी ।
निजतसे वाजवी कुसरी ॥१॥
वाचा-तारा लाविल्या हारी ।
येके स्वरे वाजवी चारी ॥२॥
इंद्रियरंध्रे केली प्रगट ।
मनसारी लाउनी नीट ॥३॥
ॐकारध्वनि सूक्ष्मनाद ।
मातृका पिळोनी शुद्ध ॥४॥
बहेणि म्हणे अनुभव घ्यावा ।
वाजवी कोण तो पहावा ॥५॥
