वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अवतारांच्या पंगती हे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076195 · अभंग क्र. ३८६

386.
अवतारांच्या पंगती हे लीला कवणाची ।
जाणती हे चासी स्वानुभवी ॥१॥
आणिकांसी न कळे जाले थोर थोर ।
पाहिजे तो शूर ज्ञानवंत ॥२॥
सत्रावीस काय उन्मनी बोलती ।
प्रेम वाहे म्हणती कोणा सांगो ॥३॥
मूळमाया निवृत्ति गुणसाम्य प्रकृति ।
कोणासी म्हणती सांग कैसे ॥४॥
अद्वय जे होते द्वैतासी आणिले ।
हे कोणाचेनि आले जाणावया ॥५॥
एकी हा अनेक अनेकी हा एक ।
अन्वय व्यतिरेक कैसा सांग ॥६॥
बहेणि म्हणे याची केली ब्रह्मकळा ।
म्हणोनि अंबेला शरणांगत ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग