वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

आता तरी बालका आणी।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089935 · अभंग क्र. ३८

38.
आता तरी बालका आणी।
आपल्या करे मी लेववीन लेणी।
यशोदा म्हणे मांडिली हाणी।
निवांत पोरटे नसेची ॥१॥
मग जाऊनिया पालखाजवळी।
म्हणे मृत्यु पाचारिंतो तूते वनमाळी।
उगाचि असतासि जरि ये कळी।
तरि वांचतासी काय करु ॥२॥
ऐसे बोलोनिया आणिला।
पूतने वोसंगा बैसविला।
देखताचि पूतने वोसंडला।
उभंड प्रेमाचा न सावरे ॥३॥
सुंदरपणाचि झाली सीमा।
उपदेशी मदना अंगी काळीमा।
अवलोकूनिया पुरुषोत्तमा।
तनुमनप्राणे निवाली ॥४॥
म्हणे गे यशोदे साजणी।
परम सुखाची हे लाधलीसी धणी।
जतन करी पुत्रमणी।
दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥
पूतना राक्षसी अति क्रूर।
तेही देखोनिया कृष्णचंद्र।
नयनी अश्रु आणूनिया वारंवार।
श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥
निळा म्हणे अगाध बुध्दी।
होउनी परतली प्रालब्द सिध्दी।
म्हणे कार्य साधूनिया त्रिशुदी।
जावे सत्वर राजभुवना ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग